राजुरी येथे कृषी दूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करमाळा – संजय साखरे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, सुरु असलेल्या ग्रामीण कृषी जागृकता, कार्यानुभव आणि कृषी-औद्योगिक जोड कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत राजुरी तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय बाभुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथील विद्यार्थी कृषिदूत ओंकार लक्ष्मण दुरंदे याने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांतर्गत त्याने शेतकऱ्यांना प्रगत शेती करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय, तांत्रिक शेती करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज, सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती, जलसिंचन ,पशुधन याविषयी माहिती दिली. तसेच शेती विषयक सरकारी विविध योजनांची माहिती दिली.
यासाठी त्याला कृषी महाविद्यालय बाभूलगाव, ता येवला ,जि नाशिक चे प्राचार्य डॉ डी.पी कुलधर सर,प्रा.म्हस्के सर, प्रा.राठोड सर,प्रा .साळुंखे सर,प्रा .कोळगे सर,प्रा.बाजड सर यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी शेती प्लॉट वर कृषी दूत ओंकार दुरं दे सह आदिनाथ कारखाना माजी संचालक लालासाहेब जगताप,शेती अधिकारी नंदकुमार जगताप,प्रगतशील बागायतदार सतीश जगताप,अजित जगताप,धनंजय जगताप,खाटमोडे यांच्यासह महिला शेतकरी उपस्थित होत्या.