नामसाधना मॉडर्न स्कूलची अबॅकस मध्ये वैभवी माकुडे महाराष्ट्रात प्रथम
करमाळा समाचार

नामसाधना मॉडर्न स्कूलची अबॅकस मध्ये वैभवी माकुडे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक विद्यार्थिनी वैभवी औदुंबर माकुडे
(जुनिअर लेवल ) तीने 6 मिनिटात 70 पैकी 67 गणित अचूक सोडवली आहेत.

नामसाधना मॉडर्न स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी वैभवी माकुडे अबॅकसच्या ज्यूनियर लेवल मध्ये महाराष्ट्रात अव्वल
येथील करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी च्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील नामसाधना मॉडर्न स्कूल ची चिमुकली विद्यार्थिनी दि . १५ आक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेच्या ज्युनियर लेवल मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आली आहे .
या स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते .नामसाधना मॉडर्न स्कुल या इंग्लीश मेडीयम शाळेत UKG मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु . वैभवी माकुडे या विद्यार्थिनीने फक्त ६ मिनीटात ७० पैकी ६७ गणिते अचूक सोडवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे . ही परीक्षा सांकेतिक गणिती क्रिया कमीत कमी वेळेत व अचूक सोडवण्यासाठी तसेच बौध्दिक क्षमता वाढ करणाऱ्या अबॅकस च्या या परीक्षेत लहान वयात हे यश मिळवल्याने कुमारी वैभवी ने प्रशालेच्या वैभवात भर पडली असून शाळेचा लौकीक वाढवला आहे . या शिवाय अल्पावधीतच या शाळेने विवीध उपक्रमांसह स्पर्धात्मक परीक्षातही घवघवीत यश मिळवले असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अशा उत्कृष्ट निकालातून सिद्ध केले आहे .

या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा . आ . जयवंतराव जगताप , विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , युवानेते तथा बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप यांचेसह प्रशालेचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक , पर्यवेक्षिका , वर्गशिक्षका ,अध्यापन करणारे सर्व शिक्षक -शिक्षिका वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी कुमारी वैभवी माकुडे हीचे विशेष अभिनंदन केले आहे . या यशासाठी कु वैभवी ला या यशासाठी सहशिक्षीका सौ . कोरडे , सौ . वायकर, सौ . दिवाण ,सौ. वीर , कु . बागवान , सौ . मेकळकी इ . चे मार्गदर्शन लाभले .

