करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

चालकाला डुलकी लागल्याने कार गाडीचा भिषण अपघात ; एक ठार पाच जखमी

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील वरकुटे कुर्डूवाडी रस्त्यावर भीषण अपघातात एक ठार तर पाच जखमी झाले आहेत. सदरची घटना आज पहाटे साडेचार च्या सुमारास घडली आहे. सदर कार चालकाला झोप अनावर झाल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे सदरचा अपघात घडला आहे. प्रवासी कर्नाटक हून गुजरातच्या दिशेने निघाले होते. करमाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालयात जखमींना पोहोच केले आहे.

गुजरात येथील प्रवासी कर्नाटकला गेलेले होते. कर्नाटकहुन माघारी परतत असताना कुर्डवाडी वरकुटे रस्त्यावर सकाळी साडेचार च्या सुमारास चालकाला झोप अनावर झाली व रस्त्यावरील एका झाडावर जाऊन कार गाडी धडकली. यावेळी अपघात इतका भीषण होता की गाडीचा चकणाचुर झाला आहे. यातील एक जागीच ठार तर गाडीतील इतर पाच गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघात संदर्भात करमाळा पोलिसांना माहिती मिळाली. यावेळी घटनास्थळी हवालदार आप्पा लोहार, मेजर आनंद पवार, पोलीस कॉन्स्टेबल सतीश इंगोले तर साजीद यांची माजी सैनिक रुग्णवाहिका वेळेवर पोहोचल्याने इतर गंभीर जखमींना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE