करमाळ्यात आज बालारफी विरुद्ध हादी इराणी भिडणार ; जीन मैदान येथे कुस्ती स्पर्धा
करमाळा – विशाल घोलप
करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे आज पासून कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भारत व इराण प्रमुख कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र केसरी बालारफि शेख व इराणचे हादी इराणी यांच्यासह महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर हे भिडताना दिसणार आहेत. सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. संजयमामा शिंदे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे आयोजन सुनिल सावंत तालिम संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजता जीन मैदान करमाळा येथे सदरच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत, माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप, मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, टायगर ग्रुप चे तानाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते संकेत खाटेर, उद्योगपती उस्मान तांबोळी, आळजापुर सरपंच संजय रोडे, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान खाटेर व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, कुस्ती सम्राट असलम काझी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, प्रवीण घुले, उपमहाराष्ट्र केसरी विजय मोढाळे, भाऊसाहेब खरात, महाराष्ट्र चॅम्पियन बंडू मोढाळे, महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय गोडसे, महाराष्ट्र चॅम्पियन संतोष गायकवाड, अभिमान पवार, नाथा मारकड, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव, जिल्हा परिषद सभापती उस्मानाबाद नवनाथ जगताप, कोळेकर वस्ताद, बाळू पवार, पप्पू माने, शरद कार्ले, मंगेश आजबे, मोहन पवार, गणेश महाराज नागणेकर, विलास काळे, पंडित भुसारे यांच्यासह इतर पैलवानांचा सन्मान होणार आहे. सर्वसामान्याचे कुस्ती मल्लविद्या या यूट्यूब चैनल द्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहेत.