करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिर

करमाळा


मानवी जीवनामध्ये आरोग्य ही माणसाला मिळालेली मोठी देणगी असुन माणसाच्या आरोग्याला समृद्ध करण्याचे काम वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून डॉक्टर देवदूताचे काम करीत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये आरोग्य जनजागृती बरोबरच सर्वसामान्य जनतेला माफक योग्य तत्पर तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर यांनी व्यक्त केले.

डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल विश्वराज हॉस्पिटल पुणे च्या संयुक्त विद्यमाने एक मार्च रोजी मोफत मारुती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घघाटन ज्येष्ठ प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर,डॉ रोहन पाटील ,जेष्ठ डॉक्टर श्रीराम परदेशी ,डॉ विठ्ठल पवार ,डॉ तानाजी जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्रयांच्या हस्ते करण्यात आले. व करमाळा मेडिकल असोसिएशन व करमाला मेडिकोज गिल्ड मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत वीर म्हणाले की, परमेश्वराने डॉक्टरला देव दुतासारखे काम दिले आहे. मनुष्य जीवन दुःख मुक्त पीडा मुक्त करण्यासाठी प्रत्येक डॉक्टर शिवा भाऊ वृत्तीने काम करत आहे. करमाळा तालुक्यातील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे. डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल करमाळा विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विश्वराज हॉस्पिटल मधील दहा सुपरस्पेशालिटी तज्ज्ञांनी सेवा दिली . डॉ दर्शन गौड, डॉ प्रमोद सुर्वे, डॉ विक्रम पाटील, डॉ दर्शन गार्डे डॉ दोशी व इतर अनेक डॉकटर्सनी या शिबिरात सहाशे तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामद्ये रुग्णांना मोफत तपासणी , लॅबमधील रक्ताच्या तपासण्या , मोफत औषधे देण्यात आली. त्यांना जो आजार झाला आहे त्याची योग्य निदान लवकरात लवकर करून आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया ही मापक दरात केल्या जाणार आहेत.

करमाळा तालुक्यासारख्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना तपासणीसाठी शस्त्रक्रिया साठी पुणे नगर सोलापूर या ठिकाणी जाऊन तपासणी करावी लागत आहे यामध्ये वेळ पैसा याचा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता परंतु आता करमाळ्यामध्ये डॉक्टर रविकिरण पवार यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने तालुक्याबरोबरच जामखेड कर्जत राशीन टेंभुर्णी या भागातील ही या शिबिराचा लाभ झाला आहे. वेळेवर योग्य उपचार घेऊन रुग्ण बरा होत असल्याने नागरिकांतून यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

या शिबिराप्रसंगी डॉ लावंड,डॉ अविनाश घोलप, डॉ अक्षय पुंडे, डॉ सादिक बागवान, डॉ अनुप खोसे, डॉ गुंजकर अधीक्षक कुटीर रुग्णालय करमाळा, डॉ नागेश लोकरे, डॉ पोपट नेटके,डॉ.प्रमोद शिंदे, डॉ प्रशांत करंजकर, डॉ विशाल शेटे,डॉ महेश दुधे, डॉ हर्षवर्धन माळवदकर,डॉ राजेश तोरडमल, डॉ चंद्रकांत सारंगकरदन्तरोग तज्ञ् , डॉ पवार प्रमोद, डॉ भुजबळ संतोष, डॉ कमलेश जांभळे, डॉ उमेश जाधव,डॉ महेंद्र नगरे, डॉ शरदचंद्र पवार, डॉ महाजन सुभाष, डॉ.विनोद गादिया,डॉ संदीप महाजन, डॉ निलेश जांभळे, डॉ मेहेर opthalmologist डॉ.संजय बुद्धवंन्त, प्रा महेश निकत,महेशजी चिवटे साहेब, गणेश करे पाटील, करमाळा केमिस्ट असोसिएशन चे सर्व पदाधीकारी, करमाळा पॅथॉलॉजिकल लॅब असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञ् नागेश चेंडगे पत्रकार,बाळासाहेब गोरे गुरुजी अशोक गायकवाड, दादासाहेब पुजारी,महादेव भोसले, हेमंत बिडवे, सागर गायकवाड, उपस्थित होते. डॉ अजिंक्य पवार डॉ प्रज्वल खेडकर यांच्या शैक्षणिक यशप्रित्यर्थ व पवार जनरल हॉस्पिटलच्या नूतनीकरणानिमित्त हे शिबीर आयोजित केले होते .

डॉ कमलेश किरण परदेशी , डॉ श्वेता काळे, दिपक मुंढे, वैभव गायकवाड सिद्धी मेडिकल व पवार हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांनी शिबीर यशस्वी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE