पवारांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेच्या भगव्या शिवबंधनाचा रंग फिक्का झालाय का ? ; अदिनाथ वाचवण्यासाठी शिवसेना नेते का पुढे येत नाहीत ?
करमाळा समाचार
आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत होत असलेल्या राजकारणावर बोलत असताना बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि आज मागील तीन वर्षापासून आणि सुरु असलेल्या राजकारणावर दिलखुलास उत्तरे दिली. आदिनाथ सुरू करावा अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवली. सभासद हा कारखान्याचा मालक आहे त्यांनी जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे बोलून दाखवले. पण शिवसेना सत्तेत असताना महाविकास आघाडीचे सरकार असताना त्याच्याच पक्षातील मोठ्या गटाला हतबल व्हावे लागत असताना पक्ष मात्र ठामपणे पाठिशी उभा राहत नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे हातावर बांधलेले शिवबंधनाचा भगवा रंग पवार कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे फिक्का पडतोय काय असा प्रश्न निर्माण होतोय.
बागल गट विधानसभेचे पूर्वी राष्ट्रवादी सोबत होता. अनेकदा कारखान्यांसाठी पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनीही बऱ्याचदा सहकार्य केल्याचेही बागल कुटुंबीयांनी सांगितले आहे. कारखान्यात जवळपास नव्वद कोटींची साखर व 150 कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना यावर केवळ एकशे 30 कोटींचे कर्ज होते. साखर पडून राहिली पण ती विक्री करून कर्जातील काही रक्कम कमी होईल व त्याचा फायदा आदिनाथ होवून कारखाना चालू राहील अशी परिस्थिती असतानाही बँकांनी बागलांचे कुठलीही ऐकून न घेता आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सरफेसी ची कारवाई केली.
घाईगडबड करीत कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयही झाला. पण मागील दोन वर्षांपासून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कारखाना अद्याप पूर्ण न झाल्याने सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यावेळी हा कारखाना कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी घेण्याचे ठरवले त्या पद्धतीने त्यांच्या या बाबत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ सर्वाधिक बोली लावून हा कारखाना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. पण पण एम एस सी बँकेप्रमाणे एन सी डी सी बँकेचे हे कर्ज असल्याने त्या बँकेने आडवे लावल्याने हे सर्व प्रकरण प्रलंबित आहे.
पण बागल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना सहकार्य करणे अपेक्षितच नाही. पण बागलांनी आपला जुना पक्ष सोडुन विधानसभेचे पुर्वी शिवसेनेत प्रवेश केला. ते निवडून जरी आले नसले तरी तालुक्यात त्यांचा दबदबा कायम आहे. एक मोठा गट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्या बागलांकडे शिवसेना प्रवेश केल्यापासून आजतागायत पक्षाकडून असे विशेष लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची बागल यांना सहकार्य करण्याची इच्छा नाही, का पवारांचा आदिनाथ मध्ये हस्तक्षेप असल्यामुळे शिवसेनेला तिकडे लक्ष द्यायचे नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच या भगव्या रंगावर विश्वास ठेवून शिवबंधन हातात घातले ते शिवबंधन बागलांना शुल्लक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार नाही का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
विधानसभेच्या भाषणांमध्ये शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर तत्कालीन नेते तानाजी सावंत यांनी कारखाना अडचणीतून बाहेर काढल्या संदर्भात शब्द दिला होता. शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुळातच सावंत यांची पक्षात अशी जागा राहिलेली दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षा करून उपयोग नाही. पण शेतकरी व कामगार यांच्यासाठी तरी कमीतकमी शिवसेनेने पुढाकार घेऊन कारखान्याला अडचणीतुन बाहेर काढणे गरजेचे आहे.