करमाळासोलापूर जिल्हा

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत

 करमाळा समाचार – संजय साखरे 


राजुरी तालुका करमाळा येथील प्रगतशील बागायतदार वसंत लालासाहेब भोईटे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे 11 हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.

आज सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, पेन, कंपास, रंग पेटी अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी वसंत भोईटे, गणेश जाधव,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब जाधव ,विमल जाधव , प्रतिभा भोईटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अर्चना जाधव आदि उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE