राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त करमाळा येथे महिलांसाठी हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन
करमाळा समाचार
स्वराज्यजननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून महिलांसाठी हिमोग्लोबिन व शुगर तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिजाऊ जन्मदिन 12 जानेवारी मंगळवारी सकाळी 10 वा हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यशकल्याणी संस्थेच्या विश्वस्त सौ शितलताई करे पाटील यांच्या हस्ते तसेच मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अमित निमकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी देविदास सारंगकर, प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ बिभीषण सारंगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.

यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील हे स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुका वैद्यकीय व्यवसाय संघटनेच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत असून करमाळा शहर व तालुक्यातील गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्याकडून करण्यात आले आहे.