करमाळासोलापूर जिल्हा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा- वांगी गावचे देशमुख यांची कृषी अधिकारी

प्रतिनिधी – करमाळा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतुन वांगी गावचे सुपुत्र श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मधून काल झालेल्या मुलुखाती मधून २०३ जणांची अंतिम निवड झाली आहे. त्यामध्ये वांगी क्रमांक एक येथील श्रीराज नानासाहेब देशमुख यांची ५६ व्या रँक नुसार निवड झाली आहे.

या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व कृषिसेवा गट -ब संवर्गातील पदांसाठी निवड केली जाणार आहे. वांगी गाव चे श्रीराज देशमुख यांचे शालेय शिक्षण अकलूज येथे तर महाविद्यालयिन शिक्षण कोल्हापूर येथील ऍग्री कॉलेज मध्ये पार पडले आहेत तर एम एस सी ॲग्रीचे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ मधून पार पडले आहे. श्रीराज देशमुख यांचे वडील नानासाहेब एकनाथ देशमुख हे अकलूज येथील सहकार महर्षि सह साखर कारखाना येथे नोकरीस आहेत. श्रीराज देशमुख यांच्या यशाचे वांगी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे व पेढे वाटून अभिनंदन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE