रुग्णसेवेसाठी ३६ वर्ष काम करणाऱ्या भोसले यांचा सन्मान ; सेवानिवृत्त निमित्ताने कामाचे कौतुक
करमाळा समाचार
आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सुनीता भोसले सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनिता भोसले ह्या करमाळा उपजिल्हा रुग्णालयात गेली छत्तीस वर्षापासून अखंडपणे सेवा बजावत होत्या, 1985 पासून त्यांनी आपल्या कर्तव्य सुरुवात केली होती. अशा या परिसेविका चा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आला.

परिसेविका भोसले मॅडम यांनी कोरोना काळात सामान्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली. आपले कर्तव्य बजावत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले. गरजू रुग्णांना फार चांगली सेवा दिली. अशा या कर्तव्यनिष्ठ परिसेविका श्रीमती सुनिता भोसले यांचा शासकीय सेवेतुन नियमित वयोमानानुसार सेवा निवृत्ती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी बुधभूषण फाउंडेशन चे व्हा चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी फाउंडेशन चे सदस्य अमोल यादव, राहुल बागल, मंगेश बागडे, गणेश राठोड, मिलिंद माने, खलील बागवान, नवनाथ इंगोले, आनंद शहा, सुशील राठोड उपस्थित होते. फाउंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे यांनी दूरध्वनी वरून भोसले मॅडम यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.