करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

कुंटणखाना चालवल्याप्रकरणी दोघांना अटक दोन फरार ; ११ महिलांची सुधारग्रहात रवानगी

करमाळा समाचार

कुंटणखान्याच्या संशयातुन करमाळा तालुक्यातील कोर्टी व वीट परिसरातील हॉटेल वर छापा टाकुन आकरा महिलांची सुटका करीत दोन्ही भागातील ४ चालकांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. यावेळी दोघे फरार तर दोघांना अटक केली आहे. सदरची कारवाई दि २९ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक शुभमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा व सोलापूर पोलिसांनी संयुक्तऱित्या केली आहे.

प्रदिप शिवानंद सुरवसे रा. ओम गजानन चौक, विजापूर रोड, सोलापूर, गणेश नागप्पा उकले रा. नांदणी ता. उत्तर सोलापूर यांना कोर्टी तर रोहिदास नामदेव जगदाळे (वय ६०) रा. वीट व संतोष रोहिदास जगदाळे रा. वीट या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रदिप सुरवसे व रोहिदास जगदाळे यांना ताब्यात घेतलेय त्यांना सोमवार पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोन्ही ठिकाणच्या आकरा महिलांना सोलापूर येथील महिला सुधारग्रहात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी शुभमकुमार यांच्याकडे असलेल्या माहीती नुसार त्यांनी एक पथक सोबत घेतले. शिवाय करमाळा पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या सोबत एक पथक घेऊन रात्री एका बनावट गिर्हाईक म्हणून एकाला सोबत घेतले व वीट येथील साईलिला हॉटेल जवळ पोहचले यावेळी तिथे छापा टाकल्यानंतर वेगवेगळ्या भागातील सहा महिला मिळुन आल्या तर चालक यावेळी फरार झाला. यावेळी पोलिसांनी दुसरे चालक रोहिदास यांना अटक केली. तसेच कोर्टी परिसरात लकी लॉज व हॉटेल वर चालत असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला यावेळी परप्रांतीय पाच महिला मिळून आल्या आहेत. याशिवाय चालक सुरवसे याला अटक केली आहे.

सदरची कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलिस अधिक्षक शुभमकुमार मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार अझर शेख, अजित उबाळे, गणेश शिंदे महिला पोलिस पर्वत यांच्या पथकाकडुन करण्यात आली. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक विनोद घुगे हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE