निर्भीड पत्रकार म्हणून जाधव यांना सन्मानपत्र देऊन सन्मान ; 26 जानेवारीचे औचित्य साधत कार्यक्रमाचे नियोजन
अकलूज (प्रतिनिधी )
नागपूर येथील सामाजिक कल्याण ऐवं मानव संरक्षण संघा चे माळशिरस तालुका अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने आणी अकलूज शहर अध्यक्ष समर उदय कोतमिरे यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून अकलूज येथील पत्रकार आणी संघर्ष योद्धा या पोर्टल चे संपादक गणेश जाधव यांना घरी येऊन निर्भीड पत्रकार म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना माळशिरस तालुका अध्यक्ष अमोल माने यांनी सांगितले की, आपण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आणी देशाच्या उज्वल भविष्यासाठी, तसेच समाजात एकता राखणे साठी पत्रकारिता च्या माध्यमातून भरीव योगदान दिले असून, त्यामुळे आपले काम प्रशंसनीय आहे. त्यामुळे या संघटने च्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे सन्मानपत्र देत आहोत. असे सांगितले.

संघटनेचे अकलूज शहर अध्यक्ष समर कोतमिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या 25 वर्षापासून पत्रकारीते च्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न शासन दरबारीं मांडून, तसेच अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावून, लेखणी च्या माध्यमातून अनेक समस्या, गोरगरीब जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडून, तसेच अन्याय अत्याचार करणाऱ्या च्या वास्तववादी बातम्या लावून, तसेच अनेक अधिकारी यांना काम करण्यासाठी भाग पाडून अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न मांडून ते तडीस नेले आहेत. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हे सन्मानपत्र देण्यात येत आहे. असे सांगितले.