करमाळासोलापूर जिल्हा

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या ४ विद्यार्थ्यांची गव्हर्नमेंट अभियांत्रिकी साठी निवड

समाचार –


मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या पहिल्याच बॅच मधील ४ विद्यार्थ्यांची निवड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग साठी निवड झाली असून सर्व तालुक्यात याचीच चर्चा सुरू आहे.

यामध्ये ओंकार गोडगे याची गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी पुणे , अभिषेक बागडे याची गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, आदित्य सोनवणे याची गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड तर तृप्ती माने हीची गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. तसेच महेश थोरात या विद्यार्थ्याचा पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नामांकित कॉलेज मध्ये निवड झाली आहे.पहिल्याच बॅच मधून चांगल्या संख्येने विद्यार्थ्याची निवड झाल्यामुळे सर्व पालकांना मधून इन्स्टिट्यूट चे कौतुक केले जात आहे.

या निमित्ताने इन्स्टिट्यूट चे संस्थापक महेश निकत यांनी सर्वाचे अभिनंदन करत याही पुढे तालुक्यातील असंख्य विद्यार्थांना याच प्रमाणे गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्यास तयार असल्याचे सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE