करमाळ्यात नव्याने उत्तीर्ण झालेल्या उपनिरिक्षकांचा सन्मान
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करमाळा तालुका यांच्या वतीने आज करमाळा येथे उपनिरीक्षक पदी नूतन निवड झालेले अमर वसंत ननवरे (पूनवर), वैभव बाळासाहेब भोगल (बोरगाव), उद्धव तुळशीराम काळे (उत्तर वडगाव) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सीनियर एपीआय श्री संदीप बापूराव नरसाळे व तालुकाध्यक्ष संतोष भैय्या वारे, युवक अध्यक्ष केशव चोपडे, किसन सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलावडे, तालुका सरचिटणीस समाधान शिंगटे, तालुका उपाध्यक्ष रविराज घाडगे, अशोक नरसाळे, उद्योजक कृष्णा ढेरे, श्रीकांत ढवळे, सामाजिक पप्पू ढवळे, लाड, पुनवर गावचे नरसाळे उपस्थित होते.
