पत्नीस रागावल्याने पती व सासुला बेदम मारहाण ; कारण ऐकले तर हसु पण येईल आणी संतापही
करमाळा समाचार
तंबाखू खाण्याच्या कारणावरून पत्नीने पतीने रागावल्याच्या कारणावरून पत्नीच्या माहेरच्या व्यक्तीने येऊन पतीला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात 1) कुंडलीक निवृत्ती शिंदे 2) नितीन बाळासाहेब शिंदे 3) साधना कुंडलीक शिंदे सर्व रा.तांदळवाडी, बारामती ता.बारामती जि.पुणे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण मधुकर मदने वय 24 वर्षे धंदा मजुरी यांनी तक्रार दिली आहे.

गावात कृष्णाई इंटरनशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नावाची इयत्ता पहीली ते सातवी कक्षेपर्यंत शाळा आहे. त्याची साफसफाई करण्याचे काम मदने कडे असते. सध्या ते शाळेचे चेअरमन तानाजीराव निवृत्ती करचे रा.बारामती जि.पुणे यांचे परवानगीने शाळेच्या आवारात असलेल्या कामगारांसाठी असलेल्या खोलीमध्ये पत्नी व मुलांसह राहतात.

काल दि. 05/06/2021 रोजी सकाळी पत्नी शुभांगी हीस तंबाखु खाणेचे कारणावरुन रागात बोलले. त्याचा राग मनात धरुन पत्नी शुभांगी हीने तीचे माहेरी सांगीतले होते. त्यानंतर पत्नीचे माहेरुन 1) कुंडलीक निवृत्ती शिंदे 2) नितीन बाळासाहेब शिंदे 3) साधना कुंडलीक शिंदे सर्व रा.तांदळवाडी, बारामती ता.बारामती जि.पुणे हे सर्वजण आले होते. व शुभांगी हीस तंबाखु खाण्याचे कारणावरुन रागाने का बोललास असे म्हणुन त्याने घराचे बाजुला पडलेला पोखंडी पाईप हातात घेऊन त्या पाईपने माझे डावे हाताचे दंडावर, दोन्ही पायांचे मांडीवर मारुन मला जखमी केले आहे.
तसेच नितिन शिंदे याने देखील तेथेच पडलेला लोखंडी पाईपने माझे पाठीत मारुन मला जखमी केले. त्यावेळी माझी आई सुमन ही मध्ये सोडवण्यासाठी आली असता तीलाही कुंडलीक शिंदे, नितिन शिंदे तसेच साधना शिंदे यांनी त्यांचे हातातील लोखंडी पाईपने तीचे पाठीत व दोन्ही पायांवर मारहाण करुन तीस जखमी केले करुन माझी मोटार सायकलचा आरसा व खोपडी फोडुन नुकसान करुन आम्हाला शिविगाळ, व दमदाटी केली आहे.