मी मुख्यमंत्री म्हणुन बोलतोय आणी जबाबदारीने बोलतोय – उद्धव ठाकरे ; मराठा आरक्षण बद्दल मोठे व्यक्तव्य
करमाळा समाचार
मराठा आरक्षणाची लढाई आता अंतीम टप्प्यात आली आहे. मराठ्यांना आरक्षण देताना दुसऱ्या कोणत्याच समाजावर अन्याय होणार नाही पण अशी सडक्या बुद्धीच्या लोकांना मुद्दाम दोन समाजात वाद लावायचे आहेत. आग लावणाऱ्या लोकांच्या आगीत आता पाणी टाकण्याची वेळ आलीय अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाद्वारे दिली आहे. तर आपल्या भाषणातुन सर्वच विषयावरुन विरोधकांचा समाचारही घेतला.

