चौकशी करून नवीन दुरुस्ती सुरू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून खड्ड्यात पुरणार
करमाळा समाचार
जातेगाव करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर सध्या परतीच्या पावसाने नंतर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून अनेक अपघात या मुळे होत आहेत संबंधित अपघातात अनेक प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. गेल्या वर्षी लाखो रुपयांचा खर्च करून संबंधित रस्त्याची दुरुस्ती केली होती. परंतु, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करून अगदी सहा महिन्याच्या आत संबंधित रस्त्यावर पुन्हा तेवढेच खड्डे पडले असून पीडब्ल्यूडी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत आहेत.

या अनुषंगाने आज जातेगाव करमाळा टेंभुर्णी हा रस्ता दहा दिवसाच्या आत खड्डे बुजवून दुरुस्त न केल्यास आणि संबंधित गेल्यावर्षीचा कॉन्ट्रॅक्टर या यादीत टाकून त्याची सखोल चौकशी न केल्यास ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या रस्त्याची देखरेख केली जाते त्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संबंधित रस्त्यावरील खड्ड्यात पुरवण्याचे आंदोलन प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. या आशयाचे निवेदन आज करमाळा पीडब्ल्यूडी शाखा तसेच करमाळा पोलीस स्टेशनला देण्यात आले असून दहा दिवसाच्या आत जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर प्रहार स्टाईलने मोठ्या प्रमाणात वर सूचित केल्याप्रमाणे आंदोलन करण्यात येईल जे घडेल जे परिणाम होतील त्याची संपूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची राहील.

यावेळी प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार विकी मोरे पप्पू ढवळे पांगरे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील अमोल कोडलिंगे,सुनील जाधव गोविंदा विटकर ,सुनील जाधव,भारत माने,शहाजी डिकोले, शँकर डिकोले,अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते…