करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरसोलापूर जिल्हा

आ. ऱोहित पवारांची माणुसकी ; अपघातग्रस्त परप्रांतीय मजुरांना पोहचवले दवाखान्यात

करमाळा समाचार 

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारत असलेल्या ध्वजाच्या स्वागतासाठी करमाळा तालुक्यात दुपारी तीन वाजल्यापासूनच युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु स्वराज्य ध्वज येण्यास एका वेगळ्याच कारणाने उशीर झाला. पंढरपूर येथून निघालेला टाफा गुरसाळे येथे पोहोचल्यानंतर एक अपघात घडलेला रोहित पवार यांना दिसुन आला. यावेळी तीन परप्रांतीय मजूर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते.

स्वराज ध्वज यात्रा ही हजारो किमीचा पल्ला गाठून पुन्हा कर्जत तालुक्यात माघारी जाणार आहे. दरम्यान ठिकठिकाणी स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथून स्वतः आ. पवार हेही या यात्रेत सहभागी झाले व त्यांनी आपला ताफा करमाळा तालुक्याच्या दिशेने वळवला. करमाळ्यात दुपारी तीनच्या सुमारास पवार यांचे आगमन होणार होते असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण दुपारी एक वाजल्यापासूनच दत्त मंदिर येथे जमा होण्यास सुरुवात झाली होती.

पण पंढरपूर पासून काही अंतरावर गुरसाळे गावातल्या शिवारात तीन परप्रांतीय मजुरांचा अपघात झाल्याचा रोहित पवार यांना आढळून आले. या वेळी संपूर्ण ताफ्यासह पवार हे त्या ठिकाणी थांबले व त्या मजुरांची विचारपूस करू लागले. यावेळी उपस्थितांनी मधून रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रूग्णवाहीका काही वेळेवर आली नाही. त्यामुळे पवार यांनी सदरच्या रुग्णांना आपल्या गाडीमध्ये पोचवण्याचं नियोजनातील आखले व तिघांनाही स्वतःच्या गाडी मध्ये दवाखान्यात पोचण्याचे काम केलं. त्यामुळे परप्रांतीय मजुरांसाठी दाखवलेल्या माणुसकीने कार्यकर्ते भारावून गेले.

आमदार रोहित पवार स्वराज ध्वज यात्रेची धामधूम सुरू असताना गावोगावी स्वागत व कार्यकर्ते वाट बघत असताना त्यांनी मजुरांसाठी फक्त आपला वेळ खर्च केला नाही. तर त्यांना आपल्या गाडीतही दवाखान्यापर्यंत पोहोचलेले आहे. त्या शिवाय दवाखान्यात होणारा सर्व खर्च हे स्वतः रोहित पवार उचलणार असल्याचे जे मिळत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE