जबाबदारी घेत नसाल तर रस्ता खोदणार ; प्रशासनच्या भुमीकेकडे लक्ष
करमाळा समाचार (karmala samachar)
दत्त मंदिर ते न्यायालय रस्ता कोणत्याच कार्यालयाच्या आराखड्यात येत नसल्याने सदरचा रस्ता अपघात क्षेत्र तसेच आरोग्याला धोकादायक बनला आहे. असे असताना प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याने मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या नंतर जनशक्ती संघटनेने यात लक्ष घातले आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा २६ जानेवारी पूर्वी हा रस्ता खोदण्यात येईल असा इशारा जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे (atul khupase) यांनी दिला आहे. शिवाय प्रशासनाला रस्ता करणे होत नसेल तर आम्हाला दत्तक द्या अशी ही विनंतीही यावेळी खुपसे यांनी केली आहे.

दत्त मंदिर ते कोर्ट गेल्या अनेक दिवसांपासून खराब असलेल्या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये नागरिकांच्या जीवितास तसेच आरोग्यास धोका उत्पन्न होत असतानाही प्रशासन योग्य वेळी भूमिका घेत नसल्याने त्याचा तोटा होताना दिसून येत असल्याचे खूपसे यांनी नमूद केले आहे.

सदर रस्त्यावर फक्त मंजूर निधी केल्याने तिढा सुटत नाही. तर तो निधी आणला तर तो रस्ता पूर्ण होऊ शकेल. जेणेकरून लोकांना त्रासाला सामील सामोरे जावे लागणार नाही. सदरचा रस्ता कोणाच्याच मालकीचा नसेल तर तो खोदण्यात येईल हे करत असताना आम्हाला कोणत्याही शासन शासकीय यंत्रणेला त्रास द्यायचा नाही. परंतु हा रस्ता नेमका कोणाच्या मालकीचा आहे हेच कळत नसेल तर दाद कोणाकडे मागायची ? शिवाय या रस्त्याचे काम प्रशासनाला करायचे नसेल तर जनशक्ती संघटनेला हा रस्ता दत्तक द्यावा आम्ही तेथे संघटनेमार्फत दुरुस्ती करू अशी विनंती ही यावेळी पत्राद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनाही हवेत विरली…
मागील आठवड्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (milind shambharakar) एका कार्यक्रमानिमित्त याच रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे आले होते. त्यांच्याकडे महाविद्यालयाच्या शिक्षकांनी अडचण मांडली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचा निधी उपलब्ध करण्यावरून चर्चाही झाली. परंतु जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्रम आटोपुन माघारी फिरल्यानंतर त्याच्यावर एक रेघही ओढली नसल्याने हा प्रश्न जैसे थे पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी होईल का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.