करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

फक्त पद नाही तर आणखी मोठी जबाबदारी रश्मी बागलांच्या पदरात ; रिटेवाडी बाबत फडणवीसांचे मोठे वक्तव्य

करमाळा समाचार – विशाल घोलप

 

भारतीय जनता पार्टी म्हणजे एक कुटुंब आहे व कुटुंबातील असलेल्या सर्व सदस्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे इथून पुढे तुमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची चिंता आपण करू नका कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणे आमचे काम आहे. तर आपण सुचवलेली रिटेवाडी उपसा सिंचन योजनेतील अडचणी दूर करून योजना साकारण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बागल यांच्या प्रवेशावेळी दिले आहे.

मुंबई येथे भाजप कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत बागल गटाच्या नेत्या तथा संचालिका साखर संघ मुंबई रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी स्वागतानंतर श्री. फडवणीस बोलत होते.

मंगळवारी पाचच्या सुमारास रश्मी बागल दिग्विजय बागल व विलासराव घुमरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आवर्जून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रश्मी बागल यांचा उल्लेख संघर्षशील नेतृत्व असा केला. तालुक्यात काम करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करीत संघर्ष करीत वडिलांच्या नंतर गट सांभाळून लोकांमध्ये मिसळून काम केल्यामुळे सदरची पदवी ही फडवणीस यांनी रश्मी बागल यांना बहाल केली. तर त्यांनी आता कार्यकर्त्यांची चिंता करू नये त्यांची चिंता आता कुटुंबाचा सदस्य म्हणून आमची चिंता असल्याचेही यावेळी फडवणीस यांनी बोलून दाखवले.

यावेळी मकाई चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ चे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी उपाध्यक्ष आदिनाथ नानासाहेब लोकरे, मकाईचे संचालक सतीश नीळ, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटी संचालक काशिनाथ काकडे, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, मकाई संचालक अनिल अनारसे, विष्णू गरजे, कलीम काझी, रितेश कटारिया, नानासाहेब शिंदे, आनंदराव कांबळे, विलास भोसले आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

पदासह लोकसभा मतदार संघाची जबाबदारी …
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच साखर संघ मुंबईच्या संचालका रश्मी बागल यांना भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदरचे पत्र अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE