करमाळासोलापूर जिल्हा

वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करून  शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ

करमाळा/जेऊर

अवकाळी पावसाने करमाळा तालुक्यात शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून  या पिकांची पाहणी माजी आमदार नारायण पाटील यांनी  थेट शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे. रविवार ता.5 रोजी वरकटणे (ता.करमाळा) येते अशोक पाटील यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली .

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात  शेतकर्यांच्या केळी कांदा ,  ज्वारी , मका, तूर  या पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील दोन दिवसात वरकटणे गावातील परमेश्वर जाधव या शेतकऱ्याला कांदा विकल्यावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यालाच 567 रूपये द्यावे लागले. कांद्या बरोबरच केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत कालच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत या मागणीचे निवेदन दिले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच पाहिजे, यासाठी आपण शासनाकडे मागणी केली आहे. संपूर्ण तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केले असुन प्रत्यक्ष मुख्यमंञ्यांची भेट घेणार आहे.

ads

करमाळा मतदारसंघातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजेत यासाठी आपण आग्रही राहणार आहोत.
जर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाने मदत केली नाही तर वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करून  शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.
यावेळी अशोक बापूराव पाटील शेतकरी,सागर पाटील, किरण पाटील ,गणेश पाटील,राहुल मस्कर,बाळासाहेब वाघमारे, संजेय तनपुरे उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE