करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ना. जयंत पाटलांच्या भेटीला

करमाळा समाचार

करमाळ्याच्या विकासात्मक बाबींचे प्रस्ताव १५ दिवसात दाखल करा . निधीची कसलीही कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिली असल्याची माहिती करमाळा नगरपरीषदेचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी दिली . २८ डिसेंबर रोजी जलसंपदा भवन पुणे येथे नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी ना . जयंत पाटील यांची भेट घेवून करमाळ्याचे विविध विकास कामांचे प्रस्ताव व निधीची उपलब्धता याबाबत चर्चा केली .

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, युवा उद्योजक चेतककुमार गुगळे उपस्थित होते . यावेळी नगराध्यक्ष जगताप यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून त्वरीत १५ दिवसात प्रस्ताव दाखल करा निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगीतले .याप्रसंगी ना . जयंत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत . लोकनेते राजाराम बापू पाटील व देशभक्त नामदेवराव जगताप यांच्यातील असलेल्या स्नेहाच्या संबंधाचा आवर्जून उल्लेख करीत मी व जयवंतराव जगताप आमच्या दोघांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ एकाचवेळी अपक्ष आमदार म्हणून विजयी होत झाला.

माजी आ .जगताप व आपल्यातील मैत्रीपूर्ण , सौहार्दाच्या संबंधांची माहिती देत करमाळ्याच्या विकासात्मक कामांना निश्चितपणे मदत करणार असल्याची ठाम ग्वाही दिली अशी माहिती नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी दिली .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE