मकाई निवडणुकीत सुरु असलेल्या सुनावणीत विरोधकांना पुन्हा एकदा झटका
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवाराच्या अर्जांवर अद्यापही रस्सीखेच सुरू असलेले नेमके कोणती पावलं उचलावीत याबाबत संभ्रम होता. पण आता दुसऱ्यांदा झालेल्या सुनावणीत विरोधी गटाला पुन्हा झटका बसला असल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. आजच्या निकालात तब्बल २१ अर्जावर निकाल देण्यात आला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आलेली असताना आता विरोधी गटातील उमेदवार कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. परंतु संपूर्ण प्रक्रियेत केवळ पात्र आणि अपात्र या प्रश्ना पुढेच विरोधक फिरत राहिल्याने प्राचारयंत्रणा अपेक्षेपेक्षा मंदावलेली दिसून आली. यामुळे दुसऱ्या प्रकारे बागल गटाचा यात फायदा होताना दिसत आहे.

उच्च न्यायालयाने जरी सुनावणी घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेले असले. तरी पुरावे व माहितीच्या आधारांवर पुन्हा एकदा निर्णय हे निवडणूक निर्णय अधिकारीच घेणार होते. त्यामुळे त्यांना निर्णय घेत असताना कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागणार होता. शिवाय त्यांनी मागील पहिला निकाल जो दिला होता तो तसाच किंवा त्यात बदल करावा लागणार होता. त्यामुळे आत्ता आलेला निकाल हा अपेक्षितच असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुक लागलेले गटनिहाय उमेदवार:-
भिलारवाडी – रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे , सुनिता गिरंजे, आप्पासाहेब जाधव, पारेवाडी : उत्तम पांढरे, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, गणेश चौधरी, मांगी- दिनेश भांडवलकर, अमोल यादव, सुभाष शिंदे, महिला राखीव प्रतिनिधी- कोमल करगळ, अश्विनी झोळ, सुनिता गिरंजे
अविरोध गटनिहाय उमेदवार:-
चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी- सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी- नवनाथ बागल , भटक्या जाती जमाती- बापु चोरमले, इतर मागास- अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती: अशिष गायकवाड .