करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भिगवण येथे विक्रीस आला चित्तला मासा ; बाग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ, भारतात आढणारा मासा भाव खाऊन गेला

केत्तूर (अभय माने) –

बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळसह भारताच्या ब्रह्मपुत्रा, महानदी, गंगा व इंडस नद्यांच्या खोऱ्यात आढळणारा व चवीला अतिशय स्वादिष्ट असलेला चित्तल मासा भिगवण (या. इंदापूर) येथील मासेबाजारात भलताच भाव खावून गेला. अधिक पसंती असलेला व माश्यांमध्ये अधिकाधिक प्रथिने असलेल्यने या माश्याला मत्सयाहारी खवय्ये पसंती देतात.

महाराष्ट्रातील नद्यांमध्ये दुर्मिळाने आढळणारा हा मासा तीन-चार दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड एका तलावात सापडलेला आहे. भोसले नावाच्या मच्छिमाराला एक तळ्यात सापडलेला हा मासा भिगवण येथील भगवान महाडिक यांच्या बापूसाहेब फिश मार्केटवर विक्रीला आला होता. लिलाव बोलीत नवनाथ बंडगर यांनी अधिक बोली लावत खरेदी केला. पावणे दहा किलो वजनाच्या या माशाला भिगवणच्या प्रसिद्ध मासळी बाजारात प्रति किलो 520 रुपये दर आल्याने या एका माश्याची 5070 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.

माशाची वैशिष्ट्ये –

भगवान विष्णूचा अनेक अवतारांपैकी मत्स अवतार एक आहे. दानवांचे संहार करण्यासाठी विष्णुने या माशाचा अवतार घेतल्याची पुराण कथेत ऐकायला मिळते. चिताला (Chitala chitala) असे शास्त्रीय नाव असलेल्या या माश्याला इंडियन नाईफ फिश (Indian knife fish) या नावानेही ओळखतात. या माश्याचा रंग चकाकणारे रूपेरी असून पाठीवर ठराविक अंतरावर सफेद आडवे पट्टे असतात. हे पट्टे शेपटीच्या टोकापर्यंत असतात. सुमारे तीन फूट लांबी व अडीच फूट रूंदी आकाराच्या या माशाचे प्रमुख खाद्य झिंगा,पाण्यातील कीटक व इतर लहान मासे हे आहे. हा मासा आकाराने मोठा होत असला दिसण्यास हा गावरान माश्यातील चालट जातीच्या माश्याप्रमाणे आहे.जगातील अनेक देशात या माश्याला मोठी मागणी आहे.

” राज्यात नावाजलेल्या भिगवणच्या मासळी बाजारात नव्या जातीचे मासे नेहमी विक्रीला येतात.राज्यातील विविध ठिकण्याहून मत्स्य व्यापाऱ्यांना या नवनवीन माशांबद्दल उत्सुकता असते.भिगवण ता. दंदापूर) येथील मासेबाजारात चित्तल मासा विक्रीला आल्याचे समजल्यावर मत्स्याहारी खवय्यांना पर्वणी ठरली आहे.
– डॉ.अरविंद कुंभार,प्राणिशास्त्र अभ्यासक

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE