करमाळा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उद्घाटन
समाचार –
आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे मा.अमीतसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तसेच मनसे नेते मा. दिलीप (बापू) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्यसचिव मा. आशिष साबळे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष मा.सतीश फंड उपजिल्हाध्यक्ष मा.आनंद मोरे मनसे करमाळा तालुका अध्यक्ष ( बापू ) घोलप मनसे करमाळा शहर अध्यक्ष नाना मोरे मनसे तालुकाउपाध्यक्ष पै.मा.अशोक गोफणे , म.न.वि.से तालुकाध्यक्ष दिग्विजय घोलप , सुशील नरूटेम. न. वि. से. शाखा कार्यकारिणी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, मनविसे शाखा अध्यक्ष धीरज गपाट, मनविसे सरचिटणीस गोपाळ जगताप,
मनविसे शाखा उपाध्यक्ष तानाजी काळे, मनविसे सरचिटणीस युवराज शेगर व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
