तालुक्यात तीन गावात लम्पीचा प्रादुर्भाव ; एक गाई दगावली तर दोघांवर उपचार सुरु
समाचार टीम
राजुरी व परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला लसीकरण करावे यासाठी विनंती केली होती. पण लसीकरण केले जात नव्हते. त्यासाठी लंम्पी प्रादुर्भाव व लागण असलेले जनावरे मिळून येणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. पण आता तालुक्यात तीन ठिकाणी लम्पी चा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

करमाळा तालुक्यातील वीट, राजुरी व सावडी येथे तीन जनावरांना सदरची बाधा झाल्याची निष्पन्न झाले होते. मागील पाच ते सहा दिवसांमध्ये सदरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरातील पाच किलोमीटर गावांमध्ये लसीकरण करण्यासाठी सुरुवात केली होती. या दरम्यान वीट- बैल , राजुरी जर्सी गाई व सावडी गावराण गाई अशी लागण झालेली जनावरे होती.

सध्या वीट व सावडी येथील दोन्ही जनावरे सध्या उपचार सुरू आहे. तर राजुरी येथील जर्सी गाई ही बाधित आल्याच्या चार ते पाच दिवसाच्या उपचारानंतर दगावल्याची माहिती पशुधन अधिकाऱ्यांनी दिले आहे. तर मागील तीन ते चार दिवसात संपूर्ण पाच किलोमीटरचा परिसरात लसीकरण केल्याची ही माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे. संबंधित प्रकारचा आजार कुठे दिसून येत असल्यास त्वरित पशुधन आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.