पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
करमाळा समाचार
पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्याने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता दौंड येथे 9 हजार चाळीस क्युसेक विसर्ग उजनीत येत होता. सायंकाळी सहा वाजता 13 . 94 टक्के पाणीसाठा झाला होता.

यंदा दोन जून रोजी योजनेतील पाणीसाठा 22.42 टक्के इतका खाली गेला होता. उजनी धरणातील परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ होत गेली होती. धरण परिसरात चालू हंगामात 97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी पहिल्यांदाच दौंड येथे विसर्ग उजनीत मिसळण्यास सुरुवात झाले आहे. रविवारी सायंकाळी 16.49 टक्के पाणी साठा होता.

दौंड येथील विसर्ग चालू असल्याने यामध्ये दोन टक्के वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पावसावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. तर उजनी वर अवलंबून असलेल्यांची नजर पुणे जिल्ह्यातील पावसाकडे आहे. उजनी किती प्रमाणात भरते यावेळी यावर आडसाली ऊस लागवडीचे क्षेत्र अवलंबून राहणार आहे. सध्या उजनी धरणात एकूण 56.19 टीएमसी पाणीसाठा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा वजा 7.47 टक्के आहे.