सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत केत्तुर शाखेत कर्मचारी वाढवा
प्रतिनिधी – दिलीप दंगाणे
ग्रामीण भागातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखा केतुर (पारेवाडी) या शाखेमध्ये कर्मचारी स्टाफ अपुरा असल्यामुळे बँकेत सतत गर्दी होत आहे. ती गर्दी कमी होऊन लोकांची कामे जलद व्हावीत म्हणुन बॅंकेत कर्मचारी वाढवावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत शिवाजीराव पाटील यांनी केली आहे.याबाबत सरव्यवस्थापक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखाधिकारी यांना निवेदन दिले आहे

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेत जास्त शेतकऱ्यांची खाते असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग या बँकेत मोठ्या प्रमाणात येतो. तसेच वयोवृद्ध खातेदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सदरच्या बँकेतून विज बिल भरणा तसेच शेती संदर्भात उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची या बँकेला पसंती आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा केतुर (पारेवाडी) या शाखेतील कर्मचारी वाढवण्यात यावेत अन्यथा खातेदारांच्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो असे निवेदन दिले आहे.