करमाळासोलापूर जिल्हा

माझ्या वाक्याचा विपर्यास करून टीआरपी वाढवला – खा. छत्रपती संभाजीराजे

करमाळा समाचार

पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना वास्तव परिस्थितीचे भान ठेवून लिखाण करणे गरजेचे आहे,  केवळ टीआरपी वाढवण्यासाठी दिलेल्या बातम्यांमुळे समाज स्वास्थ्य बिघडू शकते याचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका पत्रकार संघाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, चिखलठाण सरपंच चंद्रकांत सरडे, बापू झोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ, सविता शिंदे, नलिनी जाधव, केमचे माजी सरपंच अजित तळेकर, बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, रामभाऊ ढाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रमेश कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, लक्ष्‍मण भोसले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना छञपती संभाजीराजे म्हणाले की, तुळजापूर येथे मराठा समाजाचा संयम सुटलेला असताना मला त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाषण करावे लागले यावेळी बोलताना मी म्हणालो की, तुम्ही सर्वजण तलवारी म्यान करा वेळ आल्यानंतर मी तलवार काढेन माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की, उपस्थित समाज ज्या पद्धतीने घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त करत होते तो राग शांत करण्यासाठी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून परस्थिती हाताळण्यासाठी हे मी वक्तव्य केले.

ads

पण त्या ठिकाणच्या पत्रकारांनी मी संपूर्ण भाषणात काय बोललो हे न लिहिता आता संभाजी राजे कोणावर तलवार चालवणार असा प्रश्न उपस्थित करून दुसऱ्या दिवशी भडक बातम्या दिल्या, आमच्या विरोधी पक्षाने तर आता संभाजीराजे ओबीसींवर तलवार चालवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले कारण मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने काम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज असून मी मी बाराबलुतेदार अठरा पगड जातींना पुढे घेऊन जाणारा माणूस आहे आणि मला त्याच पद्धतीने राजकारण समाजकारण करायचे आहे.

मात्र माझ्या वाक्याचा विपर्यास करून जो टीआरपी वाढला त्याचा त्यांना आनंद झाला असेल, पण मला त्याचे किती दुःख झाले हे मी शब्दात सांगू शकत नाही यामुळे माजी पत्रकारांना एकच विनंती आहे की, शक्यतो समाजाचा हिताचेच लिखाण झाले पाहिजे करमाळा तालुका पत्रकार संघाच्या काही अडचणी असल्यास मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे, यावेळी पत्रकार संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती महाराजांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE