नगर परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर ,4 करमाळा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
करमाळा समाचार
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिना निमित्त नगरपालिका प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेत ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दादासाहेब इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत ध्वजगीत प्रतिज्ञा व संविधान प्रशालेतील विद्यार्थिनींनी सादर केले. हार्मोनियमची साथ शाळेतील शिक्षक श्री मुकुंद कुसळे सर यांनी दिली. तर तबलावादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मुरलीधर अब्दुल सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ जयश्री वीर मॅडम उपस्थित होत्या.

पालक श्रीरामचंद्र बनकर, गोपाळ वाघमारे, महादेव वाघमारे, श्रीयुत पलंगे, श्री रजपूत, श्री दीपक भोसले, सौ जाधव मॅडम, श्री वायकर, श्री सुनील दगडे, श्री अमित चुंग, श्री दशरथ ननवरे गुरुजी, सौ शिंदे मॅडम, श्री बबन राखुंडे, पिल्लू इंदलकर, अंगणवाडी सेविका मनीषा मांडवे मॅडम व सुपेकर मॅडम पालक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रकला टांगडे मॅडम यांनी केले व आभार श्री दुधे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक श्री संतोष माने सर, श्री मुकुंद मुसळे सर, श्रीमती आसराबाई भोसले मॅडम यांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व मुले गणवेशात नगरपालिका करमाळा येथे ध्वजवंदनासाठी घेऊन जाण्यात आले. तिथे न प प्राथमिक शाळा नंबर 4 या शाळेने राष्ट्रगीत ध्वजगीत प्रतिज्ञा व संविधान सादर केले. शाळेतील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा दीपक भोसले हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त माझा भारत देश महान या विषयावर अतिशय उत्कृष्ट असे भाषण केले.
त्याबद्दल प्रांत अधिकारी श्रीयुत समाधान घुटूकडे साहेब, प्रशासनाधिकारी श्री अनिल बनसोडे साहेब, केंद्र समन्वयक श्री दयानंद चौधरी सर, वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे यांनी हर्षदा चे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिला सेवानिवृत्त मुख्याध्यापक अब्दुले सर, नगरपालिकेच्या सौ स्वाती माने, सौ सुषमा केवडकर मॅडम, श्री संतोष माने व अनेक मान्यवरांनी हर्षदास बक्षिसे दिली. उपस्थितांचे आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विक्रम राऊत सर यांनी मानले.