करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राष्ट्रवादीला जागा सुटण्याच्या नुसत्या वावड्या ; करमाळ्यात शिवसेनेचाच भगवा फडकवणार

करमाळा समाचार

 

शिवसेना-भाजप युती झाली तेव्हापासून करमाळा मतदार संघ शिवसेनेचाच असून या मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेला आहे. गतवर्षी शिवसेनेत बंडखोरी झाली. शिवसेनेतून इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांची मते एकत्रित केली तर शिवसेनेचा उमेदवार पन्नास हजार मतांनी विजयी झाला असता. करमाळा शिवसेनेची स्वतंत्र ताकद असून शिवसेना हा मतदार संघ सोडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर करमाळ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार अशा प्रकारची अफवा व चर्चा काही लोकांनी जाणीवपूर्वक करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल पत्रकारांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना यांना प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले, काही कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार अशा बावड्या उठवण्यास सुरुवात केली आहे, शेवटी पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील तोच उमेदवार या मतदारसंघातून धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे.

उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्व श्री अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना आहे. उमेदवार कोणीही असला तरी धनुष्यबाणाच्या चिन्हावरचा उमेदवार करमाळा मतदारसंघातून विधानसभेला निवडून जाणार हे निश्चित आहे.

आज आरोग्य मंत्री तानाजी राव सावंत यांच्या प्रयत्नामुळे करमाळ्याची अर्थवाहिनी असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी करमाळा तालुक्याला उपलब्ध झालेला आहे. प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील अनेक मातब्बर नेते येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

2019 चे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार या दोघांची मतांची बेरीज जवळपास एक लाख पंचवीस हजाराच्या घरात जाते. येणारी निवडणूक शिवसेना सर्वांना एकत्रित घेऊन लढवणार आहे. करमाळा मतदार संघ जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत निश्चितपणे जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला मिळवतील असा शिवसैनिकांना विश्वास आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE