करमाळासोलापूर जिल्हा

पोंधवडी चारीचे काम पुर्ण तीन दिवस पाणी सोडण्याच्या सुचना

करमाळा समाचार

जुलै महिण्याच्या अंतिम टप्प्यात पाणी सोडण्याची सोय करण्यात येईल. पाच हजार हेक्टर क्षेत्र याच्या माध्यमातून ओलीता खाली यऊ  शकते ही चांगली बाब आहे. तर लवकरात लवकर पाणी कसे येईल याचे प्रयत्न करु असे आश्वासन खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले तर शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सात दिवसात तीन दिवसासाठी पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

यावेळी विहाळ, पोंधवडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली तर गेट बसवण्याची इच्छा ही व्यक्त केली यावेळी काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी गणेश चिवटे, अफसर जाधव,बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, सरपंच काकासाहेब सरडे, जयंत काळे पाटील, गणेश गोसावी आदिसह शेतकरी उपस्थित आहेत.

विहाळ परिसरातुन भैरवनाथ कारखान्याकडुन जाणाऱ्या मार्गावत येळे वस्ती येथुन मोठा पोंधवडी चारी गेली आहे. या ठिकाणी कुकडीचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. सदरचे काम मागील वीस वर्षापासुन सुरु असुन आत्ता पुर्णत्वास जात आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना लाभ होईल.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE