करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर

करमाळा –

येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा, तसेच राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावेळी तालुक्यातील एमपीएससी, यूपीएससी, वैद्यकीय, क्रीडा तसेच इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव असा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कणसे यांनी दिली.

सदर पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (ता.११) सकाळी ११ वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे होणार असून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे-पाटील, संघटनेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेल्या नऊ वर्षापासून संघटनेच्या वतीने पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, शिष्यवृत्ती मार्गदर्शक अशा विविध विभागातील शिक्षक तसेच द्विशिक्षकी व बहुशिक्षकी शाळांना हे पुरस्कार दिले जातात. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी शहाजी रंदवे, चंद्रकांत वीर, अजित कणसे, नवनाथ मस्कर, संतोष शितोळे, सुधीर माने, महेश निकत, संतोष माने, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, विकास माळी, अरुण चौगुले, शरद पायघन, सुनील पवार, शरद झिंजाडे, उमराव वीर, प्रवीण शिंदे, लहू चव्हाण, सोमनाथ पाटील, दादासाहेब माळी, काशिनाथ गोमे, संपत नलवडे, अशोक कणसे, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, रघुनाथ फरतडे, भरत शिंदे, नाना वारे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षक

वैशाली बागल, हिराबाई दळवी (अंगणवाडी क्र २४, मांगी), महादेव शिंदे (खडकी), अतुल घोगरे (पांगरे), सतिश शहापुरे (करंजे), शहाबुद्दीन मुलाणी (कुंभेज), पंकज गोडगे (सावडी), कीर्ती भापकर (वरकटणे), वर्षा आगळे (कुंभारगाव), सुजाता अनारसे (वीट), वनिता इंगोले (केतुर-१), दयानंद चौधरी (न. पा. मुली-१), सुग्रीव नीळ (हिवरे), दादासाहेब बरडे (छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट), प्रा. शिवाजी वाघमोडे (भारत महाविद्यालय, जेऊर)

उपक्रमशील शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुंजहिरावस्ती (वांगी)

राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

गणेशभाऊ करे-पाटील

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE