छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त क्रिकेट स्पर्धेत गौतमा विजेता ; मुक्कदर दुसऱ्यास्थानी
करमाळा समाचार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त टेनिस बॉल क्रिकेट (हाफपिच) स्पर्धेमध्ये गौतमा क्रिकेट क्लब यांनी पहिल्या क्रमांकाचे तर मुकद्दर आणि शिवरत्न या संघाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. यास्पर्धेचे आयोजन जीन मैदान करमाळा येथे करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धांमध्ये 30 संघांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी बाद पद्धतीने ठेवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये गौतमा क्रिकेट क्लब यांनी प्रथम क्रमांकाचे 21 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. मुक्कदए क्रिकेट क्लब यांनी दुसरे पारितोषिक 15000 हे पटकावले आहे. तर तिसरे पारितोषिक शिवरत्न क्रिकेट क्लब पोथरे यांनी पटकावले आहे. तसेच चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक कुगावचा संघ विजेता ठरला आहे. त्यांना सात हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

प्रथम पारितोषिक हे अमोल लावंड, राजकुमार सुरवसे, बिबीशन आवटे व शिवक्रांती क्रिकेट क्लब यांच्या वतीने देण्यात आले होते. तर द्वितीय पारितोषिक भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, मोहन शिंदे व सनी जाधव यांच्या वतीने देण्यात आले होते. तृतीय पारितोषिक दीपक चव्हाण यांच्या वतीने देण्यात आले होते. तर चौथा पारितोषिक पैलवान रवी जाधव यांनी दिले होते. या सर्व सामन्यांच्या मालिकेसाठी चषकासाठी गणेश करे पाटील यांनी सहकार्य केले होते. तर प्रत्येक सामनावीरसाठी माळी कलेक्शन यांच्या वतीने चषक देण्यात आला आहे.
सामने सुरळीत पार पाडण्यासाठी रंजीत जाधव, सचिन ढाणे, बंटी भडंगे, सचिन उदमले, उमेश फंड, सोहेल शेख, अमोल कासार, अब्दुल शेख, स्वप्निल धाकतोडे, स्वप्निल कांबळे, बुद्धभूषण घोडके, आयुष साळवे, कालीचरण कांबळे, विजय कांबळे, प्रथमेश उबाळे, आदित्य घोडके, अतिष धाकतोडे, रोहन कांबळे, रोहन साळवे, सनी कांबळे, विशाल शिंदे, मुज्जु कुरेशी, कमलेश कदम, रोहित परदेशी, अमित बुद्रुक, संग्राम ढवळे, प्रतीक ननवरे, फय्यज मुजावर, अक्षय थोरबोले, बाशीद शिकलकर व गौतमा क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.