करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळ्यात वेंटीलेटर ऑक्सिजन बेडची मागणी ; तालुक्यातील युवकांचे मंत्रालय दिशेने शेकडो पत्र

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील रुग्णांना बाहेर उपचारासाठी पाठवले जात आहे. त्यामुळे तालुक्यातच वेंटीलेटर ची सुविधा उपलब्ध करावी म्हणुन उपमुख्यमंत्री अजितदादासह आरोग्य मंत्र्यांकडे पडणार पत्रांचा पाऊस पहिल्याच दिवशी अनेक युवकांनी पत्र पाठवले असल्याबाबत सांगण्यात येत आहे.

देशभरात सध्या कोरोना वेगात वाढत आहे. त्यासाठी प्रशासन व सरकारच्या वतीने प्रयत्नही केले जात आहेत. कोरोना महामारी ही लस येईपर्यंत आटोक्यात आणणे थोडसं अवघड जात असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोणावरही आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा अडचणींवर मात करीत पुढे गेले पाहिजे. आमचा तालुका चार जिल्ह्यांच्या सीमारेषेवर येतो. आमचा जिल्हा सोलापूर जरी असला तरी त्यापासून जवळपास 131 किमीचे अंतरावर करमाळा तालुका वसलेला आहे. करमाळ्यात आजपर्यंत 1000 बाधीतांचा टप्पा पार केला आहे. बऱ्याच रुग्णांना लक्षणेही नसतात पण प्रशासनावतीने काळजी घेत संबंधित लोकांना कोविड केअर येथे दाखल करून उपचार पूर्ण करून घरी सोडण्यात येते.

पण आवर्जून आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, करमाळा तालुक्यात रोज नव्याने 40 ते 50 नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यापाठोपाठ काही रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी, अहमदनगर, सोलापूर, पुणे अशा भागात उपचारासाठी पाठवले जात आहे. आज सोलापूर जिल्ह्यात करमाळ्या सारखा उपजिल्हा रुग्णालय कुठेही नसून तरीही या ठिकाणी वेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची सुविधा केले जात नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे. आम्हाला प्रत्येक रुग्णाला ज्यावेळी बाहेर पाठवण्याची तयारी करावी लागते त्यावेळी त्यांना त्या भागात बेड उपलब्ध होईल का नाही याची काळजी अधिक पडलेली असते. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आमच्या तालुक्यात बेड ऑक्सिजनच्या वेंटीलेटर ची सोय करावी. जेणेकरून आमच्या तालुक्यातील रुग्णांना दुसऱ्याच्या तोंडाकडे बघण्याची गरज पडणार नाही.

आज पर्यंत पूर असेल किंवा इतर कोणतीही आपदा असेल त्यावेळी करमाळा हा सर्वात पुढे राहिला आहे. त्यामुळे कायम आम्ही दुसऱ्यांच्या उपयोगाला आलेलो आहोत. आज मात्र आम्हाला गंभीर आजार असो किंवा साधा ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने किंवा आमच्या दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध करून देता येत नसल्याने रुग्णही बाहेर गावाला जात आहेत. त्या ठिकाणी बेड मिळवण्यासाठीही अडचणी होत आहेत, अशा परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या तालुक्यासाठी कमीतकमी 25 ते 50 बेडची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच जेऊर येथील कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांची व यंत्रसामग्रीची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले नसल्यामुळे करमाळ्यातील एकाच covid-19 सेंटर वर अधिक भार पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ही डॉक्टरांची सोय करावी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE