करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आमदारांच्या काळात एकही नवी बस नाही हे दुर्दैव; आमची आंदोलने अंगलट येतील

करमाळा समाचार


एस.टी. स्टँड परिसरात असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी, सतत एस.टी. चा होत असलेला खोळंबा, यामुळे प्रवाशांची होत असलेली सततची हेळसांड यासाठी जनशक्ती संघटनेने करमाळा एसटी आगाराला आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार जनशक्ती संघटना व करमाळा एसटी आगार यांच्यामध्ये बैठक झाली. यावेळी लोकांना सेवा द्या आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडु नका अंगलट येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.

स्वच्छता ठेकेदार महिनाभरापासुन फिरकला नाही म्हणून कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठाकडून देण्यात आले आहे. तर आम्ही गांधीगिरी करणारे नाहीत आम्ही थेट कचरा ऑफिस मध्येही टाकु २०१९ पर्यत आगारात बस येत होत्या पण त्यानंतर एकही बस आली नाही हे लोकप्रतिनिधीचे अपयश आहे असेही खुपसे म्हणाले.

यावेळी बोलताना खूपसे-पाटील म्हणाले की, करमाळा आगारामध्ये असलेली एस.टी. बहुतांश फिटनेस नाही. आरटीओ कडून याची कसलीच तपासणी नाही. शिवाय या चार वर्षात एक ही नवी एसटी गाडी आगाराला दिली नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात प्रशासनाने आणि आगाराने करमाळा एसटी आगाराची विकासात्मक दर्जा असणाऱ्या बाबींची पूर्तता न केल्यास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात जनशक्ती संघटनेचे आंदोलन होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE