महत्वाच्या समीतीवर नागरीक संघटनेच्या फंड तर सावंतांची आश्चर्यकारक भुमीका

करमाळा समाचार 

करमाळा नगर परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप आज करण्यात आले. यामध्ये नागरिक संघटनेच्या स्वाती फंड यांना बांधकाम सभापतीपदी वर्णी लागली असून आरोग्य कुरेशी अहमद यांच्याकडे तर शिक्षण समीती सीमा कुंभार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर बागल गटाने या निवडणुकीवर पाठ फिरवल्याने तसेच सावंत यांच्या भूमिकेमुळे दोन समित्या रिक्त राहिल्याचे दिसून आले.

सावंत -जगताप -नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी या तीनही गटांनी निवडणूक झाल्यानंतर युती करत बागल गटाला सत्तेपासून दूर ठेवले होते. पण त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या त्यामध्ये आता जगताप सावंत व नागरिक संघटना यांच्या थोडासा दुरावा आल्याचे दिसून येत होते. त्याचाच भाग म्हणून आजच्या निवड समितीच्या निवडणुकीमध्ये थोडासा बदल होईल असे अपेक्षित असताना तसे काही होताना दिसले नाही. तर नागरिक संघटनेच्या कन्हैयालाल देवी यांच्या निकटवर्तीय स्वाती फंड यांना बांधकाम समिती सभापती तर जयवंतराव जगताप गटाच्या अहमद कुरेशी यांना आरोग्य समिती सभापती तसेच जगताप गटाच्या सीमा कुंभार यांना शिक्षण समिती मिळाली आहे.

तर महिला व बालकल्याण ही समिती कमी मी सदस्य संख्या असल्याने पहिल्यापासूनच रिक्त आहे. तर सावंत गटानेही उमेदवारी अर्ज न दिल्याने पाणीपुरवठा व दिवाबत्ती ही समिती रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे. सावंत यांनी मिळत असलेल्या सभापतीपदाला उमेदवारच का दिला नाही अशी चर्चा होत आहे. त्यामुळे सगळेच काही आलबेल आहे असा समज करणे घाईचे ठरेल असेही दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!