सोलापूर जिल्ह्यातुन करमाळ्यासाठी जरांगेचा उमेदवार ठरला ; झोळ यांना संधीची शक्यता
करमाळा समाचार
जिल्हानिहाय एक उमेदवार जाहीर करण्यात येत असला तरी सोलापूर जिल्ह्यातील केवळ करमाळा येथे उमेदवार देण्याचे जरांगे पाटील यांचे निश्चित झाल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांना ही जागा देण्यात आल्याचे जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळत आहे.
करमाळा तालुका तसेच छत्तीस गावांमध्ये जरांगे पाटील यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. यासाठी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उभा राहण्यासाठी तालुक्यातून बरेचशे नेते मंडळी उत्सुक होते. तर रोजचे रोज कोणत्या ना कोणत्या पुढार्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. परंतु कोणाचाही त्या ठिकाणी प्रभाव पडला नसून सर्वसामान्य मराठा समाजासाठी लढत असलेल्या प्राध्यापक झोळ यांना जरांगे यांनी उमेदवारी जाहीर करावी अशी झोळ समर्थकांची इच्छा होती.
यासंदर्भात करमाळा तालुक्यातील उदयसिंह देशमुख तसेच प्राध्यापक रामदास झोळ या नावांची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत सुरू होती. तर लवकरच झोळ यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे झोळ यांची चिकाटी व समाजासाठी केलेले काम याला यश आले आहे आता नेमके चिन्हे काय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे