चार पत्रकारांना पत्रकारदिनी पुरस्कार ; खासदारांच्या हस्ते देण्यात येणार पुरस्कार
करमाळा समाचार
करमाळा पत्रकार संघाचे यावर्षीचे मानाचे पुरस्कार जाहिर झाले आहेत. अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलंग्न असलेल्या या पत्रकार संघाचे चार पत्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

६ जानेवारीला असलेल्या पत्रकार दिनानिमित्त २०२२ च्या करमाळा तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची घोषणा अध्यक्ष महेश चिवटे व सचिव नासीर कबीर यांनी केली आहे.

यामध्ये तालुकास्तरीय पुरस्कार ‘सकाळ’चे आण्णा काळे, साप्ताहिक गटातून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘सा. चौफेर’चे शंभुराजे फरतडे, गामीण भागातून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे ह. भ. प. नानासाहेब पठाडे व
सोशल मिडिया यूटयुब चँनल विभागातून ‘काय सांगता’चे अशोक मुरूमकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
लवकरच एका शानदार समारंभात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर व आमदार संजयमामा शिंदे
यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, असे चिवटे व कबीर यांनी सांगितले आहे.