न्यायाधीश ओंकार शास्त्री यांचा कमलाभवानी कारखान्याच्या वतीने सत्कार
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील रहिवासी श्री ओंकार संजय शास्त्री यांची प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल कमलाभवानी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री विक्रम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डायरेक्टर जनरल डांगे साहेब यांनी शास्त्री यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले. शास्त्री यांची निवड समस्त करमाळा तालुक्यासाठी भूषण व गौरवाची बाब असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना शास्त्री म्हणाले की ,कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील कायदा व सुव्यवस्था यावर अवलंबून असते .माझ्या या यशामध्ये माझे आई वडील व आई कमला भवानीचा आशीर्वाद आहे .त्यांच्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो असे सांगितले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन विक्रम सिंह शिंदे, डायरेक्टर जनरल डांगे साहेब ,जनरल मॅनेजर भोसले साहेब ,शेती अधिकारी जगदाळे साहेब परचेस अधिकारी जगताप साहेब,उमप साहेब यांच्यासह शेती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.