करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

स्वच्छता म्हणजे रोजचा सण … नाहीतर कायमचे आजार पण ; पर्यावरणपुरक गणेशोत्सवातुन लाखमोलाचा सामाजीक संदेश

सौ.दिपाली कोष्टी यांचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम…

 प्रतिनिधी – करमाळा समाचार


परंपरेनुसार आपले सण आपण साजरे करत असतो. पण या सणांच्या माध्यमातून आजकाल नवीन पद्धतीने सामाजिक संदेश देण्याची पद्धतही रुजु होत आहे. आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून समाजाकडूनही काही अपेक्षा केली जात आहे. त्यातूनच आपण साजरे करत असणाऱ्या सणांच्या माध्यमातून देखावे असतील किंवा विविध पर्याय यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश न चुकता देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामध्ये करमाळा येथील शिक्षिका दिपाली जयंत कोष्टी यांनीही गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजारपण… आहे. त्यामुळे प्रत्येक सणात स्वच्छतेला प्राधान्य देत उपक्रम राबवावेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.


पर्यावरण पूरक गणपती उत्सवाची सुरुवात करताना शिक्षीका दिपाली कोष्टी यांनी घरीच स्वतः हाताने बनवलेला मातीचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. नुसते मातीचा गणपतीचा गणपती बनवत त्या थांबल्या नाहीत. तर स्वच्छतेला प्रत्येक सणा एवढेच महत्त्व देण्याबाबत संदेश देण्यासाठी त्यांनी स्वच्छतेला आपल्या घरापासुन सुरुवात करीत फलकावर तर संदेश लिहलेच आहेत त्याशिवाय वृक्षारोपण संदर्भातील संदेश, शौचालयाच्या वापरासंदर्भातील संदेश, कचराकुंडी वापरासंदर्भातील संदेश, कापडी पिशवी वापरासंदर्भातील संदेश, धुम्रपान विरोधी संदेश, स्री शक्तीचा संदेश, कायम स्वरूपी सेंद्रीय खत निर्मिती व निर्माल्यासाठी खास व्यवस्था केली होती.

तर गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जनासाठी व्यवस्थाही स्वतः केली. हे सर्व करत असताना महिलांनी किचन गार्डनिंगकडे आकर्षित व्हावे हा उद्देश समोर ठेऊन सजावट केली होती. ️मन मोहून टाकणारी हिरवळीतील सजावट पाहुन सर्वांचे मन आनंदीत होईल अशी सजावट करण्यात आली होती. यावेळी गणपतीचे विसर्जन घरीच बादलीमध्ये करण्यात आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE