कमला भवानी शुगर ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार- संचालक विक्रमसिंह शिंदे
करमाळा समाचार – संजय साखरे
चालू गळीत हंगामात कमलाभवानी शुगर्सचे नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे असे कारखान्याचे संचालक व माढा पंचायत समितीचे सभापती श्री विक्रमसिह शिंदे यांनी सांगितले .आज कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या निमित्ताने पाचव्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याप्रसंगी कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी करमाळा अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री कन्हैयालाल देवी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री सुनील बापू सावंत, आणि युवक नेते शंभुराजे जगताप यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला. सध्या कारखान्याकडे अकरा हजार पाचशे हेक्टर उसाची नोंद झाली असून या नोंदीच्या उसावर कारखाना 170 ते 180 दिवस चालू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.शेतकऱ्यांना त्यांचा ऊस संपल्याच्या पाचव्या दिवशी पेमेंट दिले जाईल तसेच कमलाभवानी कारखान्याचा दर हा करमाळा तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा निश्चितच जास्त असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुनील सावंत, शंभूराजे जगताप, कन्हैयालाल देवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक महादेव फंड, अण्णा पवार, नगरसेवक प्रविण जगताप, प्रगतशील बागातदार समाधान भोगे, आसपाक जमादार, पत्रकार सचिन जवेरी, जयंत दळवी यांच्यासह कारखान्याचे डायरेक्टर जनरल श्री डांगे साहेब, सर्व विभागाचे मुख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक श्री डांगे साहेब यांनी केले तर आभार मुख्य शेती अधिकारी श्री जगदाळे साहेब यांनी मानले.
