करमाळासोलापूर जिल्हा

पाच जिल्ह्यातुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या उसतोड कामगारांना करमाळ्यात अटक ; १२ मोटारवाहन जप्त

करमाळा समाचार

सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक अशा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळक्याला करमाळा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून १२ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. सदरची कामगिरी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रकरणी नितीन काळूराम माळी (वय २४) रा. चांडगाव ता. श्रीगोंदा, विजय गोरख गायकवाड (वय १९) रा. कुरकुटवाडी ता. कर्जत अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयीतांची नावे आहेत. सदरची कारवाई १७ फेब्रुवारी रोजी करमाळा येथील आठवडा बाजारात करण्यात आली होती. आज पर्यत त्यांच्याकडून १२ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

करमाळ्यासह कर्जत, सांगोला, फलटण, अहमदनगर, चिखली, सिन्नर, बारामती या भागात मोटरसायकल चोरी गेल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे. सध्याचे दोन इसम ताब्यात घेण्यात आले आहेत. ते ऊसतोड कामगार आहेत. गावात पाळत ठेवून रात्री वेळी मोटरसायकलचा हँडल लॉक तोडून चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या दोघांनी करमाळा तीन, कर्जत एक, सांगोला एक, फलटण एक, अहमदनगर दोन, चिखली पुणे एक, सिन्नर एक, बारामती एक असे चोरी गेलेला मुद्देमाल मोटरसायकल जप्त केल्या आहेत. सदरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित उबाळे, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलिस शिपाई तौफिक काझी, सोमनाथ जगताप, अमोल जगताप, गणेश शिंदे , आनंद पवार यांच्या पथकाने केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस हे करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE