करमाळा भारतीय जनता पार्टी चे स्वछता अभियान संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भारतीय जनता पार्टी आयोजित सेवा पंधरवडा निमित्त आज करमाळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कै.नामदेवराव जगताप शॉपिंग कॉम्प्लेक्स राशिन रोड येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन केलं होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सकाळी एक तास सेवाजंली अर्पण करुन महात्मा गांधी यांना यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर आयोजित केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर , स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम संपन्न झाले असून. आज स्वच्छता अभियान राबवून करमाळा तालुक्यातील शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स स्वच्छ करण्यात आले .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हा सरचिटणीस किरणजी बोकन, संजय घोरपडे, जिल्ह्याउपाध्यक्ष शशिकांत पवार, जिल्हा चिटणीस श्यामजी सिंधी, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, तालुका सरचिटणीस सुहास घोलप ,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल , नरेंद्र ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण , शिवनाथ घोलप, भाजपा शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक, संतोष कांबळे, सोशल मीडियाचे नितीन कांबळे, भैय्या दळवी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व व्यापारी वर्ग यावेळी उपस्थित होते
