करमाळ्याचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांची बदली ; त्यांच्या जागी नवे अधिकारी असतील पो. नि. गुंजवटे
समाचार टीम
करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्यानंतर बदली करण्यात आली आहे. कोकणे यांनी करमाळ्यात विविध विषयात चांगली कामगीरी बजावत अनुभवाचा वापर करीत अनेक गुन्हे उघकीस आणले होते. आता त्यांची बदली जिल्हा विशेष शाखा सोलापूर येथे करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून ते करमाळा येथे कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत पोलिस वसाहतीत अतिक्रमण होऊ नये म्हणुन कंपौंड व कार्यालयीन कामकाजासाठी हॉल बांधला तर महामार्गावर होणारी लुटमार थांबवण्यासाठी दोन ठिकाणी चौकी बांधलेली स्मरणात राहिल.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे जिथे जातील तिथे आपला कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आपल्याला पाहावयास मिळाला आहे. यापूर्वीही ते मोहोळ सारख्या ठिकाणी कर्तव्य बजावून करमाळा येथे आले होते. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांनी काम केल्यानंतर करमाळा येथे काम करून त्यांनी एक आपल्या कार्याची चुणूक दाखवलेली होती. नुकताच त्यांचा चार वर्षाचा कार्यकाल हा पूर्ण झाल्यानंतर आता त्यांची जिल्हा बदली होणार आहे. त्यामुळे यात्पुरती बदली सोलापूर येथे करण्यात येत आहे.

त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या मोठ्या घटना हे त्यांनी अत्यंत शिताफीने व आपल्या अनुभवाचा वापर करीत उघडकीस आणले होते. त्यांच्या कारकीर्दीत मनोहर भोसले यांचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजले होते. त्यांच्या मठात महाराष्ट्रातून मंत्री व नेत्यांचा राबता होता. तरीदेखील त्यात पुढे काय होईल हे प्रश्नचिन्ह असतानाच करमाळा पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पोलीस यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास कायम राहिलेला होता. करमाळा पोलिसांमुळेच भोसले यांना बराच काळ हा जेलमध्ये घालवावा लागला होता.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली झाल्यानंतर आता त्यांच्या जागी सोलापूर येथील विशेष शाखेतील पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची नियुक्ती करमाळा पोलीस ठाणे येथे केली जाणार आहे. गुंजवटे यांनी यापूर्वी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्या ठिकाणी यशस्वीरित्या काम पूर्ण करून ते सोलापूर येथे विशेष शाखेत कार्यरत होते. आता ते नवे अधिकारी म्हणुन करमाळ्याचा कार्यभार स्विकारतील तर गणपतीच्या तोंडावर झालेल्या बदली मुळे नव्या अधिकाऱ्याला गावातील नियोजन बघणे आव्हान असु शकते.