करमाळाकृषीसोलापूर जिल्हा

अन्यथा आम्हाला कृषी साहित्याची दुकाने बंद ठेवावी लागतील

करमाळा प्रतिनिधी


खरीप हंगाम तोंडावर आला असून रासायनिक खते बी-बियाणे कीटकनाशके या दुकानात शेतकऱ्यांची मोठी गर्दी होणार असून अशा वेळी कृषी विक्री त्यांना संरक्षण असावे म्हणून तात्काळ कृषी विक्रेते व त्यांच्या दुकानात काम करणारे कामगार यांना लस द्यावी. अन्यथा आम्हाला कृषी साहित्याची दुकाने बंद ठेवावी लागतील असा इशारा महाराष्ट्र फर्टीलायझर सीड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदा
संघटनेचे संचालक महेश चिवटे यांनी दिला आहे.

रासायनिक खते विक्री अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत येत असून शासनाच्या नियमानुसार ही दुकाने उघडी ठेवावी लागतात नाहीतर विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी गर्दी दुकानात होणार आहे. त्याचबरोबर खते विक्री करताना प्रत्येक शेतकऱ्यांचा अंगठा प्रिंट करून संगणीकृत बिल द्यावे लागते. प्रत्येक दुकानात किमान चार ते पाच कर्मचारी असतात व सातत्याने ग्राहकांचा संपर्क येत असतो. यामुळे या सर्व विक्रेत्यांना फ्रन्टलाइन दर्जा देऊन तातडीने कोरूना ची प्रतिबंधक लस द्या.

याबाबतीत कृषी मंत्री दादा भुसे यांनाही संघटनेने निवेदन दिले आहेत. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
आता मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे नी  प्रश्‍नात लक्ष घालून तात्काळ कृषी साहित्य विक्री त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर राधेश्याम देवी, वृषभ गादिया, संजू शेठ कटारिया, राजू शेठ सोळंकी, रोहित जोशी, प्रीतम राठोड, लखन काळे गांधी आदींच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE