करमाळ्यातील रहिवासी व कुकडी कार्यालयातील लिपीक शेख यांची केंद्रीय स्पर्धेसाठी निवड
करमाळा समाचार
अखिल भारतीय नागरी सेवा ॲथलेटीक स्पर्धा 2020 – 21 हरियाणा (करनाल) या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्यातील कुकडी पाटबंधारे विभागातील इरफान जाफर शेख यांची निवड करण्यात आली आहे.

इरफान जाफर शेख हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोळाफेक स्पर्धेत सहभाग नोंदवून प्रतिनिधित्व करणार आहेत. सदरची स्पर्धा 28 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

इरफान जाफर शेख हे करमाळा तालुक्यातील कुकडी पाटबंधारे उपविभाग करमाळा येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धेसाठी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सर्व संघ जाणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने हरियाणा शासनातर्फे अखिल भारतीय नागरी सेवा अथलेटिक्स स्पर्धा 2020 – 21 आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र शासनाचा संघ सहभाग घेणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड बुधवारी 22 सप्टेंबर 2020 रोजी प्रियदर्शनी पार्क नेपियनसी रोड मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर निवड स्पर्धेत महाराष्ट्र शासनाचे सर्व खेळाडु कर्मचारी सहभाग नोंदवला त्यात यांनी 9.13 मीटर गोळाफेक करुन प्रथक क्रमांक मिळवला व शासनाच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
सदर निवडीनंतर मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, नगरसेवक अतुल फंड व सर्व शिवक्रांती संघाने त्यांचे अभिनंदन केले.