E-Paperकरमाळाकृषीसहकारसोलापूर जिल्हा

श्री आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित करत केली चौकशीची मागणी ; प्रश्नाची उत्तरे मिळतील का ?

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखाना हा सर्वात मोठा मानला जाणाऱ्या कारखान्यावर शिखर बँकेचे १२८ कोटी कर्ज असल्यामुळे कारखान्यावर बँक प्रशासन नेमण्यात आले. आदिनाथ कारखान्यावर १२८ कोटी कर्जापैकी शिल्लक असलेल्या साखरेतून १०६ कोटी अंदाजे शिखर बँकेकडे जमा मग कारखान्यावर कर्ज किती ? असा सवाल दशरथआण्णा कांबळे यांनी विचारला आहे.

यावर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्याच्या परिस्थितीवर मला मिळालेली प्राथमिक माहिती कारखान्याने गाळप केलेली साखर 3 लाख 25 हजार शिल्लक आहे. त्यापैकी 2 लाख 86 हजार साखर पोती गेल्या दोन वर्षांपूर्वीची असल्यामुळे डॅमेज झालेली आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव अंदाजे ३१०० बाजार मिळु शकतो. त्या 45 हजार पोती केलेल्या विक्रीतुन अंदाजे बारा कोटी शिखर बँकेकडे जमा आहेत. तर 2 लाख 86 हजार टॅमेज असलेल्या साखरचे ३१०० बाजार भावाप्रमाणे अंदाजे ९५ कोटी किंमत होत आहे. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर सध्या बँकेकडे १०६ कोटी‌ रूपये जमा आहेत.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले, इतर शिल्लक राहिलेली पोती याचा अंदाजे खर्च कामगार पगार, कायम आणी हंगामी , एकुण कामगार 583 आहेत. त्यांचा एकंदरीत 56 महिन्याचा थकित पगारीची अंदाजे रक्कम 55 कोटी इतकी होत आहे. तसेच , बँक ऑफ इंडियाचे काढलेलं कर्ज वाहन मालकाच्या नावावर अंदाजे 30 कोटी कर्ज आहे. तर आय सी आय पंढरपूर शाखा बँकेचे कामगारांच्या पगारीवर काढलेले कर्ज व्याजासह अंदाजे रक्कम आठ कोटी तीस लाख तर शेतकरी ऊस वाहतूक तोडणी ११ कोटी आणी शेतकऱ्यांनची चार वर्षांपूर्वीची थकित ऊस‌ उत्पादकांची अंदाजे एफआरपीची रक्कम , दीड कोटी इतकी आहे. तर सभासदांचे शेअर्स अनामत‌ रक्कम 32 कोटी यांचा कुठेही उल्लेख केला जात नाही.

प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रतील अनेक साखर कारखाने शिखर बँकेकडे थकित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील असा एकमेव साखर कारखाना आहे तो कारखाना चाचणी हंगाम घेतल्यानंतर चालुच केला नाही. तर यावर सुद्धा कर्ज आहे मग इतर कारखान्यावर बोजा असताना ही जप्तीचे नोटीस नाही. मग आदिनाथ कारखान्यावर अन्याय‌ का ?.. जर बँकेने व कारखान्याने बसुन तडजोड केली असती तर कारखाना नील झाला असता. एकंदरीत पाहिलं तर मुळ कर्ज कारखान्यावर ९० कोटी कर्ज आहे. यांच्या बेजबाबदार पणामुळे ३९ कोटी त्या रकमेवर व्याज झाले असे एकुण १२८ कोटी ४६ लाख इतके कर्ज कारखान्यावर शिखर बँकेचे आहे. तसेच औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. कामगाराचा पगार व १५ दिवसाच्या आत कारखाना चालू करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला होता. सप्टेंबर महिन्यात कामगारांच्या पगारी करण्यात आल्या होत्या.

आता नोव्हेंबर महिन्यातील १० तारिख गेली तरीही दिवाळीच्या तोंडावर कामगारांच्या पगारी अद्याप झालेल्या नाहीत. पगारी नियमानुसार कारखान्याने कराव्यात आणि आदिनाथ व मकाई कारखान्याची सभासदांची हक्काची‌ साखर सभासदांना वाटप करण्यात यावी. जर कारखान्याने न्यायालयाचा आदेश मान्य न केल्यास व सभासदांना साखर दिवाळीसाठी वाटत नाही केल्यास शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्याची वेळ कारखान्याने आणु नये अशा इशारा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. पुढे बोलताना म्हणाले कारखान्यावर प्रशासन नेमण्यात आले असले तरी अजुन कारखाना कोणाला चालवयाला देण्याचा याचा निर्णय झालेला नाही मग पवार साहेब कारखाना चालविण्यास घेणार आहे अशी चर्चा करून पवार कुटुंबाची बदनामी कोण करतंय याचा पवार साहेबांनी विचार करावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE