प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी करमाळ्यालाला प्राधान्य
प्रतिनिधी सुनिल भोसले
प्रहार जनशक्ती पक्ष प्रेरित प्रहार शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी हरिश कडु यांची संस्थापक मा.बच्चूभाऊ कडू (मंत्री,शालेय शिक्षण) यांचे आदेशानुसार महेश ठाकरे (राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना) यांनी निवड केली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सच्या नियमांचे तंतोतंत पालन करत प्रहार शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय सहविचार सभा परभणी येथील विज्ञानिकेतन विद्यामंदिर येथे घेण्यात आली. या सहविचार सभेस प्रहार शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील सर्व अध्यक्षांसह संघटनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी हरिश कडू यांची नियुक्ती करत असल्याचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी जाहीर केले.
नूतन जिल्हाध्यक्ष हरिश कडू यांचा संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना हरिश कडु यांनी “सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची अनेक प्रश्न जिल्हा स्तरावर प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच आगामी काळात संपूर्ण सोलापूर जिल्यात संघटनेचा ताकदीने विस्तार केला जाईल अशी ग्वाही दिली.
हरिश कडूंच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
