करमाळाकृषीसोलापूर जिल्हा

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चिखलठाण येथे मातीपरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा समाचार –

पानीव येथील श्रीराम कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत धनराज सरडे यांच्याकडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम या कार्यक्रमा मार्फत करण्यात येते. यादरम्यान चिखलठाण येथील शेतकऱ्यांना मृदा परिक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

वर्षानवर्षे पीक लागवडीमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे त्यासाठी मातीमध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती माती परिक्षणामुळे मिळू शकते व त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्ये मिसळू शकतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला त्यांनी याठिकाणी दिला. याप्रसंगी त्यांनी मृदा परिक्षणासाठी माती नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याठिकाणी चिखलठाण गावामधील विशाल घोडे , गोरख पाटील,अक्षय सरडे ,भाऊसाहेब सरडे,धीरज सरडे, अजिनाथ राऊत,शिवाजी सरडे, अप्पासाहेब सरडे इत्यादी. शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य. डॉ हाके सर ,कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक धीरज दोरकर, तसेच मृदा शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक. घोगरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE